क्राईमराज्य

पाळधीत पर्यटन विभागाच्या कामाचा स्लॅब कोसळला; ७ कामगार जखमी, २ गंभीर

जळगाव (धर्मेंद्र राजपूत): दि.16 धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील साईबाबा मंदिर परिसरात पर्यटन विभागाच्या वतीने सुरू असलेल्या विकासकामादरम्यान आज दुपारी एक भीषण दुर्घटना घडली. निर्माणाधीन स्लॅबचा साचा अचानक कोसळल्याने ७ कामगार ढिगाऱ्याखाली दबले गेल्याची माहिती मिळत आहे. या दुर्घटनेत हातावर पोट असणारे कामगार जखमी झाले असून, दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.

जळगाव जिल्ह्यातील पाळधी येथे पर्यटन विभागाच्या कोट्यवधींच्या विकासकामात आज “कंत्राटदाराच्या कामाच्या दर्जावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे” की हलगर्जीपणाचा स्लॅब कोसळला? असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे. साईबाबा मंदिर परिसरात सुरू असलेल्या कामाचा स्लॅब अचानक कोसळल्याने ७ कामगार गंभीर जखमी झाले असून, या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाळधी येथील साईबाबा मंदिर परिसराचा कायापालट करण्यासाठी पर्यटन विभागामार्फत कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. गेल्या वर्षभरापासून येथे मोठ्या प्रमाणावर बांधकामे सुरू आहेत. आज नेहमीप्रमाणे कामगार काम करत असताना, अचानक सुरू असलेल्या स्लॅबचा डोलारा कोसळला. मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. राडारोड्याखाली अडकलेल्या ७ कामगारांना तातडीने बाहेर काढून उपचारासाठी शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

सुरक्षेचा प्रश्न ‘ऐरणीवर’

या दुर्घटनेमुळे कंत्राटदार आणि संबंधित विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कोट्यवधींच्या निधीतून सुरू असलेल्या या शासकीय कामात कामगारांच्या जीवाशी खेळ सुरू आहे का? असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे.

कामगारांकडे हेल्मेट, सेफ्टी शूज यांसारखी सुरक्षा साधने होती का?

कामगारांचा विमा उतरवण्यात आला होता का?

बांधकामाच्या दर्जाची नियमित तपासणी केली जात होती का?

प्रशासकीय चौकशीची मागणी

हा स्लॅब निकृष्ट दर्जामुळे कोसळला की कामात हलगर्जीपणा झाला, याची सखोल चौकशी करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे. या घटनेनंतर संबंधित कंत्राटदारावर कठोर कारवाई होणार का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. सध्या जखमी कामगारांवर उपचार सुरू असून

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button