राज्य

‘कृति आराखडा’संदर्भात उद्या नाशिकमधील सोनारवाड्यात सहविचार बैठक

नाशिक / नाशिकरोड, दि. ९ : हिंदू विवाहसंस्था आणि कुटुंबसंस्था यांना बळकटी देणाऱ्या, विवाहविषयक समस्या, घटस्फोट समस्या आणि कौटुंबिक समस्या यांची सोडवणूक करणाऱ्या ‘कृति आराखडा’संदर्भात मंगळवार, दिनांक १० मार्च २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता नाशिक येथील सोमवार पेठ, दहीपूल परिसरात असलेल्या अहिर सुवर्णकार समाज संस्थेच्या ‘सोनारवाडा’ (मंगल कार्यालय) मध्ये सहविचार बैठक आयोजित करण्यात आली आहे. सहविचार बैठकीचा लाभ नाशिक जिल्ह्यातील सर्व शाखीय सोनार समाजातील प्रौढ उपवर युवक – युवती आणि त्यांच्या पालकांनी घ्यावा, असे सर्व शाखीय सोनार समाजाचे अभेद्य संघटन व्हावे, समाजाच्या विविध समस्यांची सोडवणूक सामूहिक प्रयत्नांतून कशी करता येईल, यासंदर्भात सातत्याने समाजप्रबोधन आणि समुपदेशन करणाऱ्या ‘सकल भारतीय सोनार समाज संघटन’ या व्यासपीठाचे संस्थापक मिलिंदकुमार सोनार, सहसंस्थापक सर्वश्री शांताराम गोपाळशेट दुसाने (राष्ट्रीय उपाध्यक्ष, युनिव्हर्सल विश्वकर्मा वंशज फाउंडेशन इंटरनॅशनल), विकास शांताराम विसपुते (संस्थापक संचालक, वंशावळी डॉट कॉम, पुणे), प्राचार्य किरण रघुनाथ दुसाने (यावल), ज्येष्ठ समुपदेशिका सौ. करुणाताई सोनार (अमळनेर), तसेच नाशिक जिल्हा अहिर सुवर्णकार समाज संस्थेचे अध्यक्ष श्री. राजेंद्र दिंडोरकर, खजिनदार श्री. राजेंद्रशेट जाधव खालपकर, अखिल देशस्थ दैवज्ञ सोनार प्रांतिक मंडळ महाराष्ट्र राज्यचे अध्यक्ष नदकीशोर फाकटकर, खजिनदार श्री. सुरेंद्र (बाळासाहेब) खोलमकर, माळवी सोनार समाज संस्थेचे नाशिक जिल्हाध्यक्ष श्री. राजेंद्र शेरेकर, भारतीय सुवर्णकार समाज संस्थेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री. भास्करराव मैंद आदींनी तसेच ‘सेतुबंधन’ मध्ये समाविष्ट असलेल्या विविध सोनार संस्थांच्या पदाधिकाऱ्यांतर्फे प्रातिनिधिक स्वरूपात केले आहे.

हिंदू विवाहसंस्था आणि कुटुंबसंस्था यांना बळकटी देणारा 

सर्व शाखीय सोनार समाजातील आणि विविध समाजांतील विवाहनिश्चितीविषयक समस्या, अनाठायी तसेच अवास्तव अपेक्षांमुळे प्रौढ उपवर युवक युवतींचे वाढते प्रमाण, नवदाम्पत्याच्या संसारात दोन्हीकडच्या निकटच्या आप्तेष्टांकडून होत असलेल्या अतिरिक्त हस्तक्षेपामुळे कुटुंब न्यायालयात घटस्फोटासाठी दिवसेंदिवस वाढत असलेले दाव्यांचे प्रमाण समस्यांचा साकल्याने विचार करून हिंदू विवाहसंस्था आणि कुटुंबसंस्था यांना बळकटी देणारा, विवाहनिश्चितीविषयक, घटस्फोट आणि कौटुंबिक समस्यांची सोडवणूक सामूहिक प्रयत्नांतून कशी करता येईल, याचे दिशा देणारा हा कृति आराखडा तयार करण्यात आल्याची माहिती मिलिंदकुमार सोनार यांनी दिली.

या सहविचार बैठकीस महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशातील शाखा निहाय सोनार समाज संस्थांचे तसेच सोनार समाज संस्थांशी निगडित वधु वर परिचय मेळावा आयोजक संस्था आणि सामुदायिक विवाहसोहळा आयोजक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित राहण्याची शक्यता आहे, असेदेखील त्यांनी सांगितले.

या सहविचार बैठकीस नाशिक जिल्ह्यातील सोनार समाजातील अविवाहित असलेल्या सुवर्ण कारागीर आणि सराफ व्यावसायिक तसेच त्यांच्या पालकांनी, तसेच वधु वर परिचय मेळावा आयोजक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button