स्थानिक बातम्याराज्य

जळगावात ११ मार्च रोजी डाक अदालतीचे आयोजन

जळगाव (धर्मेंद्र राजपूत) दि. 06 अधीक्षक डाकघर, जळगाव यांच्या वतीने पोस्टाच्या सेवेसंदर्भातील प्रलंबित तक्रारींच्या निवारणासाठी ११ मार्च २०२६ रोजी दुपारी ४ वाजता अधीक्षक डाकघर कार्यालय, हेड पोस्ट ऑफिस बिल्डिंग, जळगाव येथे डाक अदालत आयोजित करण्यात आली आहे.

टपाल, स्पीड पोस्ट, पार्सल, काउंटर सेवा, बचत बँक, मनीऑर्डर आदी सेवांबाबत सहा आठवड्यांत निराकरण न झालेल्या तक्रारींचा या डाक अदालतमध्ये विचार करण्यात येणार आहे.

संबंधितांनी आपल्या तक्रारी दोन प्रतीत ‘अधिक्षक डाकघर कार्यालय, पहिला माळा, हेड पोस्ट ऑफिस बिल्डिंग, जळगाव – 425001’ या पत्त्यावर दि. 9 मार्च 2026 पर्यंत किंवा त्यापूर्वी पोहोचतील अशा प्रकारे पाठवाव्यात. त्यानंतर प्राप्त झालेल्या तक्रारींवर कारवाई करण्यात येईल; मात्र त्या डाक अदालत अंतर्गत विचारात घेतल्या जाणार नाहीत, असे डाक अधीक्षक यांनी प्रसिद्धीपत्रद्वारे कळविले आहे.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button