खळबळजनक! जळगाव मनपा निवडणुकीत ‘बनावट जन्मदाखल्यांचा’ धुमाकूळ; नगरसेवक रडारवर, अनेकांचे ‘पितळ’ उघड पडणार?


जळगाव:(धर्मेंद्र राजपूत)दि.2 जळगाव महानगरपालिकेच्या राजकारणात सध्या एका धक्कादायक मिळालेल्या माहितीनुसार मोठी खळबळ उडाली आहे. आगामी निवडणुकांच्या तोंडावर काही नगरसेवकांनी आणि इच्छुकांनी चक्क ‘बनावट जन्मदाखले’ सादर केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणात प्रशासनाने आता आक्रमक पवित्रा घेतला असून, ज्या ज्या नगरसेवकांनी आपली खरी माहिती लपवण्यासाठी बनावट कागदपत्रांचा आधार घेतला आहे, त्यांचे पद जाण्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे.त्या नुसार यापूर्वीही बनावट आदेशांद्वारे दाखले मिळवल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
नेमका प्रकार काय?
मिळालेल्या माहितीनुसार, निवडणुकीसाठी आवश्यक असलेल्या निकषांची (उदा. दोनपेक्षा जास्त अपत्ये नसणे किंवा वयाची अट) पूर्तता करण्यासाठी काही लोकप्रतिनिधींनी तहसीलदारांच्या बनावट सह्या आणि शिक्के वापरून जन्मदाखले तयार केल्याचा संशय आहे? प्रशासनाने यापूर्वीच ४३ हून अधिक बनावट जन्म-मृत्यू दाखल्यांचे आदेश रद्द केले आहेत.
तपासात काय आले समोर?
१. तक्रारींचा पाऊस: विरोधी पक्षांकडून आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून अनेक नगरसेवकांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्याची मागणी होत आहे. नुकतीच एका भाजप उमेदवाराविरुद्ध देखील बनावट दाखल्याची तक्रार दाखल झाली आहे.
२. प्रशासकीय कडक पाऊले: जळगाव जिल्हा प्रशासनाने तब्बल ३,००० हून अधिक संशयास्पद जन्म-मृत्यू दाखले रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे
३. SIT ची स्थापना: या मोठ्या रॅकेटचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक (SIT) तैनात करण्यात आले असून, यात वकिलांपासून ते एजंटांपर्यंत सर्वांची चौकशी सुरू आहे.
‘त्या’ नगरसेवकांची झोप उडाली!
ज्या नगरसेवकांनी आपली खरी जन्म तारीख किंवा अपत्यांची संख्या लपवण्यासाठी या बनावट ‘सिस्टम’चा वापर केला आहे, त्यांचे पितळ उघडे पडण्याची वेळ आली आहे. जर हे दाखले बनावट सिद्ध झाले, तर संबंधित नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द होऊन त्यांच्यावर फौजदारी गुन्हे (FIR) दाखल होतील, अशी टांगती तलवार त्यांच्यावर आहे.
जळगाव टाईम्सचा सवाल:
ज्या लोकप्रतिनिधींनी जनतेचे नेतृत्व करायचे आहे, त्यांनीच जर कायद्याची फसवणूक करून खुर्ची मिळवली असेल, तर सामान्य जनतेने कोणावर विश्वास ठेवायचा? प्रशासनाने आता प्रत्येक नगरसेवकाच्या कागदपत्रांची ‘दूध का दूध, पानी का पानी’ करणे गरजेचे आहे.




