क्रांतीसुर्य महाराणा प्रताप यांचा राज्याभिषेक दिन जळगावात मोठ्या उत्साहात साजरा


जळगाव:(धर्मेंद्र राजपूत) दि. 28 मेवाडचे महान योद्धा आणि स्वाभिमानाचे प्रतीक असलेल्या क्रांतीसुर्य महाराणा प्रतापसिंह यांचा राज्याभिषेक दिन २८ फेब्रुवारी रोजी जळगाव शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेतर्फे आयोजित हा सोहळा प्रभात कॉलनी चौकातील श्री महाराणा प्रतापसिंह यांच्या स्मारकाजवळ पार पडला.
महाराणा प्रताप यांचा ऐतिहासिक राज्याभिषेक २८ फेब्रुवारी १५७२ रोजी गोगुंडा येथे झाला होता. या ऐतिहासिक घटनेचे स्मरण म्हणून जळगावात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रसंगी जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते महाराणा प्रताप यांच्या मूर्तीला दुग्धाभिषेक करून अभिवादन करण्यात आले.यावेळी उपमहापौर मनोज चौधरी,प्रवीणसिंग पाटील (अध्यक्ष, श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना)
अडव्होकेट.शुचिता हाडा (नगरसेविका), नरेंद्र पाटील,मनोज काळे (माजी नगरसेवक) अतुलसिहं हाडा, समाजसेवक,रोशन राजपूत, बापूराव साळुंखे,अविनाश,जाधव पाटील,रामचंद्र पाटील,वर्षा राजपूत,छाया देवरे,अनिता पाटील,
या सोहळ्याला राजपूत समाजातील विविध मान्यवर आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमादरम्यान महाराणा प्रताप यांच्या शौर्याचा आणि त्यांनी परकीय आक्रमकांविरुद्ध दिलेल्या लढ्याचा गौरवपूर्ण उल्लेख करण्यात आला.
या उत्साही वातावरणामुळे प्रभात कॉलनी परिसर जयघोषाने दुमदुमून गेला होता.




