स्थानिक बातम्या

जळगावात ‘होम मिनिस्टर’चा धडाका! खान्देश महोत्सवात आज रंगणार पैठणीचा खेळ

'होम मिनिस्टर' आणि खान्देशी खाद्यजत्रा!

जळगाव:(धर्मेंद्र राजपूत) दि.28 शहराच्या सागर पार्क मैदानावर सुरू असलेल्या खान्देश महोत्सवात आज महिलांसाठी विशेष मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. जळगाव शहर महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने आयोजित या महोत्सवात प्रसिद्ध अभिनेता ओम यादव यांचा ‘होम मिनिस्टर: खेळ पैठणीचा’ हा सुपरहिट शो सादर होणार आहे.

खान्देशी खाद्यजत्रा! मनोरंजनासोबतच या महोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे इथली खाद्य संस्कृती. जळगावच्या अस्सल चवीचा आनंद घेण्यासाठी येथे विशेष स्टॉल्स उभारण्यात आले आहेत.

मुख्य आकर्षण: विजेत्यांना मिळणार अनेक बक्षिसे आणि मानाची पैठणी जिंकण्याची महिलांना मोठी संधी मिळणार आहे.

प्रवेश: हा महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य असून जळगावकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महापौर दीपमाला काळे आणि उपमहापौर मनोज चौधरी यांनी केले आहे.

महोत्सवातील इतर आकर्षणे:

व्होकल फॉर लोकल: महोत्सवात १८० हून अधिक स्टॉल्स असून, यात महिला बचत गटांनी तयार केलेले गृहपयोगी वस्तू, मसाले, हस्तकला आणि खाद्यपदार्थांचा समावेश आहे.

प्लास्टिक मुक्ती संकल्प: या महोत्सवाची थीम ‘प्लास्टिक मुक्त जळगाव’ असून येणाऱ्या नागरिकांना महिला बचत गटांनी तयार केलेल्या कापडी पिशव्या मोफत दिल्या जात आहेत.

वेळ: हा महोत्सव २ मार्च २०२६ पर्यंत दररोज सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. 

महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी मनपा प्रशासनाने या कार्यक्रमाचे नेटके आयोजन केले आहे. तरी सर्व जळगावकरांनी आपल्या सहपरिवारासह या मनोरंजक सोहळ्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button