क्राईम

धडक कारवाई! प्रांताधिकारी स्वतः उतरले नदीत; वडनगरीत अवैध वाळू उपशाचे जाळे उद्ध्वस्त

जळगाव: (धर्मेंद्र राजपूत )दि.24 नदीपात्रातून होणाऱ्या अवैध वाळू उपशाच्या तक्रारींची गंभीर दखल घेत जळगावचे प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी आज वडनगरी (ता. जळगाव) येथे धडक कारवाई केली. विशेष म्हणजे, केवळ आदेश न देता प्रांताधिकारी स्वतः तीन तासांपासून नदीपात्रात उतरले होते. या कारवाईत वाळू उपसा करणारी यंत्रे आणि साहित्य जप्त करून जागीच नष्ट करण्यात आले असून, वाळू माफियांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
नेमकी कारवाई काय?
वडनगरी परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा सुरू असल्याची खात्रीशीर माहिती प्रांताधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार, आज सकाळपासूनच या भागात सापळा रचण्यात आला होता. प्रांताधिकारी गोसावी यांनी स्वतः नदीपात्रात जाऊन पाहणी केली. यावेळी वाळू उपसा करण्यासाठी वापरली जाणारी यंत्रे, लोखंडी दोर आणि इतर जाळे आढळून आले. प्रशासकीय पथकाने हे सर्व साहित्य ताब्यात घेतले असून, उपसा करण्यासाठी वापरले जाणारे दोर जागीच कापून नष्ट करण्यात आले आहेत.
.
स्वतः उपस्थित राहून कारवाईचा धडाका
“मी गेल्या ३ तासांपासून स्वतः या भागात असून अवैध उपसा रोखण्यासाठी ही मोहीम राबवली आहे. जप्त केलेली यंत्रे सरकारी वाहनातून प्रशासकीय इमारतीत जमा करण्यात येत आहेत,” अशी माहिती प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी दिली. या धाडसी कारवाईमुळे पर्यावरणाचे नुकसान करणाऱ्या वाळू चोरांचे धाबे दणाणले आहेत.
ग्रामस्थांचेही मिळणार सहकार्य
केवळ यंत्रे जप्त करून न थांबता, भविष्यात अवैध वाहने रोखण्यासाठी चोख नियोजन करण्यात आले आहे. गावातील पोलीस पाटील आणि स्थानिक तरुणांना विश्वासात घेऊन, वाळूची वाहने गावात शिरताच त्यावर तत्काळ कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button