राजकीयस्थानिक बातम्या

जळगावमध्ये २६ फेब्रुवारीपासून रंगणार ‘खान्देश महोत्सव २०२६

जळगाव प्रतिनिधी : (धर्मेंद्र राजपूत) दि.21 स्थानिक महिला बचत गट, उद्योजक आणि स्वयंसहाय्यता गटांना प्रोत्साहन देण्यासाठी जळगाव शहर महानगरपालिका आणि महिला व बालकल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘खान्देश महोत्सव २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. ‘व्होकल फॉर लोकल’ या संकल्पनेवर आधारित हा महोत्सव २६ फेब्रुवारी ते २ मार्च २०२६ या कालावधीत सागर पार्क येथे पार पडणार आहे. महोत्सवाचे हे सहावे वर्ष आहे, याबाबतची माहिती महापौर दीपमाला काळे यांनी शुक्रवारी दि. २० फेब्रुवारी रोजी दिली.

नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे महापौर, उपमहापौर यांचे आवाहन

महोत्सवाची प्रमुख वैशिष्ट्ये

या महोत्सवात खान्देशातील संस्कृती, खाद्यपरंपरा आणि हस्तकलेचे दर्शन घडणार आहे. महोत्सवात एकूण १८० स्टॉल्स असणार असून, त्यामध्ये प्रामुख्याने विविध वस्तूंचा समावेश असेल. बचत गटांनी तयार केलेल्या हस्तकला वस्तू.
होम अप्लायन्सेस, किचन अप्लायन्सेस आणि इलेक्ट्रॉनिक ज्वेलरी, सौंदर्य प्रसाधने, ऑफिस आणि होम डेकोरेटिव्ह वस्तू, खान्देशी पद्धतीचे शाकाहारी आणि मांसाहारी अस्सल खाद्यपदार्थ महोत्सवात आहेत.

मनोरंजनाची मेजवानी आणि स्पर्धा

केवळ खरेदीच नव्हे, तर नागरिकांच्या मनोरंजनासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २८ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध अभिनेता ओम यादव यांच्या उपस्थितीत ‘पैठणी, राणीहार आणि भेटवस्तू’ जिंकण्याची संधी महिलांना मिळणार आहे. गायक, समूह नृत्य आणि स्थानिक कलावंतांचे सादरीकरण होईल. लहान मुलांसाठी खास ‘गेम झोन’ आणि जादूगाराचे प्रयोग आयोजित करण्यात आले आहेत.दैनंदिन जीवनातील उपयुक्त वस्तू (मिक्सर, टोस्टर इ.) आणि उत्कृष्ट स्टॉल धारकांचा गौरव केला जाणार आहे.

महापौर दीपमाला काळे यांनी जळगावमधील सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, त्यांनी आपल्या कुटुंबासह या महोत्सवाला भेट द्यावी आणि स्थानिक महिला बचत गटांच्या उत्पादनांना खरेदीद्वारे पाठबळ द्यावे. तसेच या महोत्सवामध्ये प्लॅस्टिकमुक्ती ही थीम घेऊन नागरिकांना कापडी पिशव्या देण्याचे आम्ही नियोजन केले असल्याची माहिती उपमहापौर मनोज चौधरी यांनी माहिती पत्रकारांना माहिती दिली.

वेळापत्रक आणि आवाहन
कालावधी: २६ फेब्रुवारी ते २ मार्च २०२६.
वेळ: सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत.
स्थळ: बॅं. निकम चौक, सागर पार्क, जळगाव.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button