जळगावात ‘JJITA IT आणि सुरक्षा एक्स्पो २०२६’ चा शुभारंभ; 13 ते 15 दरम्यान अत्याधुनिक तंत्रज्ञान राहणार खुला


जळगाव :(धर्मेंद्र राजपूत) दि. 13 माहिती तंत्रज्ञान आणि सुरक्षा क्षेत्रातील क्रांतीकारी बदलांची ओळख करून देण्यासाठी ‘जळगाव जिल्हा माहिती तंत्रज्ञान संघटना’ (JJITA) तर्फे आयोजित ‘JJITA IT आणि सुरक्षा एक्स्पो २०२६’ चे आज, १३ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता खान्देश सेंट्रल मॉल येथे जळगावचे जिल्हाधिकारी रोहन घुगे हस्ते उत्साहात उद्घाटन झाले. मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्यामुळे आता जळगावकरांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचे दालन खुले झाले आहे.
या सोहळ्याला जळगाव जिल्हा माहिती तंत्रज्ञान संघटनेचे अध्यक्ष अतुल पाटील, सीपी प्लसचे क्षेत्रीय व्यवस्थापक प्रविण पाटील, प्रमा कंपनीचे अंकुर ढोले, ऑल कनेक्टचे संदिप बिरारी, पवन मंधारे, चेतन गावंडे, पुणे असोसिएशनचे राहुल खुर्द, सिबा पाठक, आनंद जगदाळे, धुळे असोसिएशनचे प्रशांत देवरे यांची विशेष उपस्थिती होती.
तीन दिवस तंत्रज्ञानाचा उत्सव
१३, १४ आणि १५ फेब्रुवारी असे तीन दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात ३० हून अधिक स्टॉल्स लावण्यात आले आहेत. यामध्ये प्रामुख्याने: प्रगत सुरक्षा यंत्रणा: एआय (AI) आधारित सीसीटीव्ही कॅमेरे आणि हाय-टेक सुरक्षा सोल्यूशन्स. आयटी सोल्युशन्स: व्यवसाय आणि उद्योगांसाठी उपयुक्त ठरणारी सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर साधने.थेट प्रात्यक्षिके: भविष्यातील तंत्रज्ञान प्रत्यक्षात कसे कार्य करते, याचे लाईव्ह डेमो पाहण्याची संधी.
तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि नेटवर्किंग
या प्रदर्शनाच्या माध्यमातून जळगावातील उद्योजक, विद्यार्थी आणि तंत्रज्ञान प्रेमींना उद्योगातील दिग्गजांशी थेट संवाद साधता येणार आहे. संघटनेचे अध्यक्ष अतुल पाटील, उपाध्यक्ष सुनील घोलप आणि सचिव सुरेंद्र मेहंदळे यांनी उद्घाटन प्रसंगी सांगितले की, “तंत्रज्ञान केवळ महानगरांपुरते मर्यादित न राहता ते जळगावच्या कानाकोपऱ्यात पोहोचावे, हाच या आयोजनाचा मुख्य हेतू आहे.” आजच्या उद्घाटन प्रसंगी योगेश चौधरी, विनोद सोनार, निलेश जैन, संदीप राठोड यांच्यासह आयटी क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
नागरिकांना आवाहन
हे प्रदर्शन १५ फेब्रुवारीपर्यंत सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत सर्वांसाठी खुले राहणार आहे. विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानातील करिअरच्या संधी जाणून घेण्यासाठी आणि व्यावसायिकांनी आपली सुरक्षा यंत्रणा अद्ययावत करण्यासाठी या एक्स्पोला अवश्य भेट द्यावी, असे आवाहन JJITA समितीने केले आहे.




