राजकीय

प्रभाग ६ मध्ये ॲड.शुचिता हाडा यांना जनसामान्यांचा मोठा प्रतिसाद; ‘स्वाक्षरी पॅटर्न’ ठरतोय पारदर्शक कारभाराचे प्रतीक!

जळगाव: जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ६ (ब) मधील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार ॲड. शुचिता अतुल सिंह हाडा यांच्या प्रचाराने मोठी गती घेतली आहे. ‘कमळ’ या चिन्हावर निवडणूक लढवत असलेल्या शुचिता हाडा यांना प्रभागातील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, एक अभ्यासू आणि कार्यक्षम नगरसेविका म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे.

काय आहे चर्चेतील ‘स्वाक्षरी पॅटर्न’?

शुचिता हाडा यांच्या पारदर्शक आणि प्रामाणिक कामाची दखल केवळ जळगावनेच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राने घेतली आहे. नगरसेविका म्हणून काम करत असताना त्यांनी राबवलेला ‘स्वाक्षरी पॅटर्न’ प्रचंड लोकप्रिय ठरला.शुचिता हाडा यांनी आपल्या नगरसेविका कार्यकाळात (२०१७-२०२२) प्रभागातील विकासकामांमध्ये पारदर्शकता राखण्यावर भर दिला होता. विशेषतः, प्रशासकीय स्तरावर प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी घेतलेली भूमिका महत्त्वाची ठरली आहे. जनतेच्या हितासाठी तात्काळ ठरावांवर सह्या करून कामांना गती देण्याची त्यांची कार्यपद्धती केवळ जळगाव शहरातच नव्हे, तर राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे..

प्रभागातील नागरिकांची कामे करताना कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार होऊ नये आणि कामात स्पष्टता असावी, यासाठी त्यांनी ही पद्धत अंमलात आणली होती. त्यांच्या या पारदर्शक कार्यपद्धतीचे कौतुक राज्यस्तरावर झाले असून, सुशिक्षित आणि अभ्यासू लोकप्रतिनिधी कसा असावा, याचा आदर्श त्यांनी घालून दिला आहे.

प्रभागात विकासाचा विश्वास

प्रचारादरम्यान शुचिता हाडा यांच्याशी संवाद साधताना नागरिक सांगतात की, “त्यांच्याकडे विषयांची सखोल जाण असून प्रशासकीय कामाचा दांडगा अनुभव आहे.” महिलांचे प्रश्न असोत किंवा प्रभागातील पायाभूत सुविधा, ॲड. हाडा यांनी नेहमीच आक्रमकपणे आणि कायदेशीर मार्गाने जनतेची बाजू मांडली आहे.

भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्येही त्यांच्या उमेदवारीमुळे मोठा उत्साह असून, प्रभाग ६ मध्ये पुन्हा एकदा ‘कमळ’ फुलणार असा विश्वास व्यक्त केला जात आहे. त्यांच्या स्वच्छ प्रतिमेमुळे आणि ‘स्वाक्षरी पॅटर्न’सारख्या अभिनव उपक्रमांमुळे सुचिता हाडा यांची उमेदवारी सध्या निवडणुकीच्या केंद्रस्थानी आहे.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button