प्रभाग १३ मध्ये परिवर्तनाचे वारे: अपक्ष उमेदवार गणेश गंगाराम शिरसाठ यांच्या उमेदवारीने नवा इतिहास घडणार!


जळगांव दि.3 आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १३ मधील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, 13 ड अपक्ष उमेदवार गणेश गंगाराम शिरसाठ यांच्या उमेदवारीने या प्रभागात नवा इतिहास रचला जाणार असल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक वर्षांपासूनचा दांडगा लोकसंपर्क आणि समाजकारणातील सक्रिय सहभाग यामुळे गणेश गंगाराम शिरसाठ यांनी मतदारांच्या हृदयात अढळ स्थान निर्माण केले आहे.
प्रभाग क्रमांक १३ मध्ये सध्या निवडणुकीचे वारे जोरात वाहत असून, अपक्ष उमेदवार गणेश गंगाराम शिरसाठ यांच्या उमेदवारीने निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली आहे. अपक्ष म्हणून त्यांना नारळ हे चिन्ह मिळाले आहे. या भागात शिरसाठ परिवाराचे असलेले ऋणानुबंध आणि स्व. गंगाराम लटकन शिरसाठ यांनी नगरसेवक म्हणून केलेल्या कार्याचा वारसा, गणेश शिरसाठ यांच्या विजयाचा मार्ग सुकर करत असल्याचे चित्र दिसत आहे.
वारसा जनसेवेचा, विश्वास विकासाचा:
शिरसाठ परिवार प्रभागातील नागरिकांच्या नेहमी सुख-दुःखात सहभागी होत आहे. केवळ निवडणुकीपुरते मर्यादित न राहता, गणेश शिरसाठ यांनी वेळोवेळी नागरिकांच्या अडीअडचणींना धावून जाण्याची भूमिका घेतली आहे. मग तो पाण्याचा प्रश्न असो, आरोग्य सुविधा असोत किंवा युवकांच्या रोजगाराचा विषय, शिरसाठ यांनी नेहमीच आक्रमकपणे आणि सकारात्मकतेने प्रश्न मार्गी लावले आहेत.
जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद:
प्रभागातील रस्ते, वीज आणि स्वच्छतेच्या प्रश्नांवर त्यांनी प्रशासनाकडे केलेला पाठपुरावा नागरिकांच्या स्मरणात आहे. त्यांच्या या निस्वार्थी समाजकारणामुळेच आज अबालवृद्ध त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे पाहायला मिळत आहे. “आमचा हक्काचा माणूस” अशी ओळख निर्माण झाल्याने प्रस्थापित पक्षांच्या उमेदवारांसमोर त्यांनी मोठे आव्हान उभे केले आहे.
प्रभाग १३ च्या विकासाचा नवा संकल्प:
“राजकारण नव्हे तर समाजकारण” हे ब्रीदवाक्य घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या गणेश शिरसाट यांना मिळणारा प्रतिसाद पाहता, प्रभाग १३ मध्ये यावेळी अपक्ष उमेदवार बाजी मारणार असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. नागरिकांच्या मूलभूत अडचणी सोडवण्यासाठी प्रथम प्राधान्य देण्याचा त्यांचा मानस मतदारांना भावत असून, यंदाच्या निवडणुकीत गणेश गंगाराम शिरसाठ हे एक प्रभाग 13 मध्ये ‘गेमचेंजर’ ठरणार? अशी चर्चा आहे.




