राज्यस्थानिक बातम्या

जळगावात ‘हाऊस ऑफ ज्वेल्स बाय बाफनाज्’ चे उद्घाटन थाटात संपन्न

सोन्याचे दागिने व डायमंड्सची विस्तृत श्रेणी ग्राहकांच्या सेवेत

जळगाव (धर्मेंद्र राजपूत) २२ :शहरातील रिंगरोडवरील पंचरत्न टॉवर, जेडीसीसी बँकेसमोर असलेल्या नूतन व प्रशस्त अशा ‘हाऊस ऑफ ज्वेल्स बाय बाफनाज्’ या भव्य शोरूमचे नव्या वास्तूत स्थलांतर व शुभारंभ सोहळा आज सोमवार, दि. २२ सप्टेंबर रोजी नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी, घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर दिमाखात पार पडला.

 

या दिमाखदार सोहळ्यास शहरासह राज्यातील राजकीय, सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये माजी मंत्री सुरेशदादा जैन, उद्योजक अशोकभाऊ जैन, नयनताराजी बाफना, आ. राजूमामा भोळे, भागवतजी भंगाळे, भरतदादा अमळकर, गोसेवक अजय ललवाणी यांच्यासह बाफना परिवाराचे ज्येष्ठ व मार्गदर्शक कस्तूरचंदजी बाफना आदी मान्यवरांची विशेष उपस्थिती होती. सर्वांच्या साक्षीने समाज चिंतामणी श्री.सुरेशदादा जैन व कस्तूरचंदजी बाफना यांनी फीत उघडून ‘हाऊस ऑफ ज्वेल्स’ या नव्या वास्तूचे उद्घाटन केले. तत्पश्चात सर्व उपस्थित मान्यवरांनी दीपप्रज्ज्वलनाने ग्राहकसेवेचा शुभारंभ करीत सोन्याचे दागिने व डायमंड्सची विस्तृत शृंखला असलेल्या दालनाचे खान्देशवासियांच्या सेवेत लोकार्पण केले. यावेळी मोठ्या संख्येने ग्राहकवर्ग हितचिंतक व परिवारातील सदस्य उपस्थित होता.

 

रिंग रोड बदलतंय..!

जळगाव शहराचे मध्यवर्ती ठिकाण म्हणून नावारूपास आलेले रिंग रोड परिसर आता बदलतंय. रिंग रोड वर विविध प्रकारच्या शोरूम्सची संख्या दिवसेंदिवस वाढत असून शॉपिंग डेस्टिनेशन बनलेल्या रिंग रोडला शॉपिंगचा अनुभव बदलतोय. आणि ग्राहकवर्ग रिंग रोडवर शॉपिंग करण्याला पसंती देत आहेत. याच रिंग रोडवर गेल्या चार वर्षांपासून चांदीचे दागिने, पूजेचे साहित्य आणि कलाकृतींसाठी प्रसिद्ध असलेल्या ‘हाऊस ऑफ ज्वेल्स’ ने ग्राहकांच्या वाढत्या प्रेमामुळे व मागणीनुसार आता सोन्याचे दागिने, डायमंड्स, पोल्की, जडाऊ, प्लॅटिनम आणि राशिरत्नांची भव्य व आकर्षक श्रेणी उपलब्ध करून दिली आहे.

मजुरीवर रु. २०,००० पर्यंतची भव्य सूट..

‘हाऊस ऑफ ज्वेल्स बाय बाफनाज्’ च्या शुभारंभ सोहळा निमित्ताने २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर (विजयादशमी) दरम्यान ‘विशेष उद्घाटन महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. ज्यामध्ये सोन्याच्या व हिऱ्यांच्या दागिन्यांवरील मजुरीत रु. २०,००० पर्यंतची भव्य सूट देण्यात आली आहे. ग्राहकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन बाफना परिवारातील सुनील कस्तूरचंदजी बाफना, अभिषेक सुनीलजी बाफना व ऋषभ सुनीलजी बाफना यांनी केले आहे.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button