शेतकऱ्यांना जिल्हाबाहेर कर्ज वाटपाचा मार्ग मोकळा आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या प्रयत्नांना यश

Jalgaon Times : (धर्मेंद्र राजपूत) जळगाव जिल्ह्यातील रहीवाशी मात्र जमीन शेजारील जिल्ह्यात असलेल्या शेतकर्यांना बॅकानी कर्ज पुरवठा बंद केल्याचा प्रश्न पाचोरा भडगाव मतदार संघांचे आमदार किशोर पाटील यांनी पावसाळी अधिवेशनात विधानसभेत उठवल्यानंतर सहकार मंत्र्यानी यासंदर्भातील मंगळवारी मंत्रालयात बैठक आयोजीत केली.
जळगाव जिल्ह्यातील सीमावर्ती भागातील शेतकर्यांना पिक कर्ज मिळतांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. शेतकरी हे जळगाव जिल्ह्यातील रहीवाशी आहेत. मात्र त्याच्या जमीनी या शेजारील जिल्ह्यातील आहे. आतापर्यंत त्यांना जळगाव जिल्हा बँकेकडून कर्ज पुरवठा करण्यात येत होता. मात्र आता अचानक हा कर्ज पुरवठा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील सीमावर्ती भागातील शेतकर्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यासंदर्भात आमदार किशोर पाटील यांनी विधानसभेत आवाज उठवला. ते म्हणाले की, आतापर्यंत त्यांना कर्ज पुरवठा करण्यात येत होता मग आता कर्ज देणे का बंद करण्यात आले? यासंदर्भात सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी मंगळवारी मंत्रालयात अधिकाऱ्याची बैठक आयोजित करण्यात आली.आमदार किशोर पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर अखेर राज्य शासनाच्या सहकार विभागाने यासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक घेण्याचे आदेश दिले आहेत.
ही बैठक पार पडल्यानंतर विकासोमुख कर्ज वाटपाच्या संदर्भातील अडथळे दूर होतील, अशी अपेक्षा आहे. यासाठी आमदार किशोर पाटील यांचा पाठपुरावा निर्णायक ठरला असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांनी घेतलेली भूमिका अभिनंदनीय आहे.