तेली समाज उन्नती पंच मंडळ तंटा निवारण समितीच्या माध्यमातून 35 जोडप्यांचे दुभंगलेल्या मनाचे मनोमीलन

जळगाव दि. 26 अलीकडे घटस्फोटांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे.अनेकदा अगदी क्षुल्लक कारणावरून देखील पती-पत्नीमध्ये लग्नानंतर काही दिवसांतच घटस्फोटाचे वादळ घोंगावते.वाद थेट न्यायालयात पोचतो. मात्र, असे वादळ क्षमविण्यासाठी चौधरी समाजातील ‘तेली समाज उन्नती पंच मंडळाने पुढाकार घेतला आहे.
तंटा निवारण समितीच्या माध्यमातून आतापर्यंत 35 हुन अधिक जोडप्यांचे दुभंगलेल्या मनाचे मनोमीलन घडवून आण्यात यश आले आहेत.सध्या प्रत्येक समाजासमोर घटस्फोट हा चिंतेचा विषय बनला आहे. लग्नानंतर समज गैरसमजुतीतून भांडण अथवा वादविवाद झाले तर वाद न्यायालयात जातो.
परंतु हे सर्व प्रकार टाळण्यासाठी संत जगनाडे तेली चौधरी युवक मंडळाचे अध्यक्ष. दत्तात्रय तुकाराम चौधरी (जळगाव) तसेच समाजातील काही जाणकार मंडळींनी तंटा निवारण समितीची संकल्पना अमलात आणली.या तेली समाज उन्नती पंच मंडळ यांच्या माध्यमातून तंटा निवारण समितीने आतापर्यंत अशा 35 हुन अधिक जोडप्यांमध्ये समुपदेशन करून समेट घडवून आणला आहे.
असे चालते कामकाज
‘समाजातील तंटे मिटवण्यासाठी ’ प्रत्येक तालुकानिहाय तंटा निवारण समिती स्थापन केली आहे. गावोगावी हे जाळे निर्माण केले असून, अकरा जणांच्या समितीत पदसिद्ध अध्यक्ष समितीचे नेतृत्व करतो. कम्युनिटी ग्रुपवरून आलेल्या तक्रारदाराकडून प्रत्यक्ष अर्ज भरून घेतला जातो.
तो सेंट्रल डेस्कचे समन्वयक जळगाव यांच्याकडे जमा केला जातो. दर महिन्याला तीन ते चार घटस्फोटांची प्रकरणे समितीकडे येतात. तेली चौधरी समाजातील सर्व समाजबांधवांना या कामी मार्गदर्शन व साहाय्य केले जाते.
फेब्रुवारी महिन्यात तीन जोडप्यांचे केल्ले समुपदेशन
नुकतेच फेब्रुवारी मध्ये पुन्हा एक कुटुंब मधील दुभंगलेल्या मनाचे मनोमिलन करण्यात तंटामुक्ती समितीला यश आले. समितीतील जाणकार लोकांनी समुपदेशन करून जळगावतील हॉटेल मधुर पॅलेस येथे दोघं कुटुंबाची बैठक घेऊन दोघांना समुपदेशन करून दोघांचा गैरसमज दूर करून दोघांना एकत्र काढण्यास तंटामुक्ती समितीला यश आले.याप्रसंगी जळगाव जिल्हा तंटामुक्ती समितीच्या समितीचे कार्याध्यक्ष दत्तात्रय तुकाराम चौधरी जळगाव जिल्हा तंटामुक्तीचे जिल्हा सचिव अनिल रामदास पाटील सर तंटामुक्तीचे उपाध्यक्ष संतोष आप्पा चौधरी तंटामुक्तीचे खजिनदार विनोद भाऊ शांताराम चौधरी कायदेशीर सल्लागार बी एम चौधरी तंटामुक्तीचे संघटक प्रमुख डॉक्टर मनिलाल चौधरी मधुकर किसन देवरे भगवान फकीरा सोनवणे दशरथ रमेश चौधरी महिला सदस्य शोभाताई चौधरी आदी पदाधिकारी उपस्थित होते .