शैक्षणिकस्थानिक बातम्या

अनुभूती रेसिडेंशीयल स्कूमध्ये दोन दिवसीय भव्य विज्ञान प्रदर्शनास सुरूवात

जळगाव दि.०७ (धर्मेंद्र राजपूत ) – ‘गुहेत राहणारा मानव ते आजचा संगणक, रोबोटिक्स व आर्टिफेशियल तंत्रज्ञानाच्या युगातील मानव या प्रवासामध्ये शास्त्राची महत्त्वाची भूमिका आहे. विज्ञान हे निसर्गाची देणगी तर तंत्रज्ञान मनुष्यनिर्मित आहे. संशोधनातून शास्त्र तर आविष्कारांतून टेक्नॉलॉजीचे महत्त्व समजण्यासाठी ‘विज्ञानानुभूती विज्ञान प्रदर्शन’ मोलाचे ठरते. विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा समतोल साधून मनुष्य जीवनात शाश्वता कशी आणता येईल, याबाबत विचार केला पाहिजे; असे मनोगत यु. व्ही. राव यांनी व्यक्त केले.’

देवाने शास्त्र तर मानवाने तंत्रज्ञान बनविले – यु. व्ही. राव

अनुभूती रेसिडेंशीयल स्कूलमध्ये दोन दिवसीय भव्य विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन, अनुभूती स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, अनुभूती स्कूलच्या संचालिका निशा जैन, प्राचार्य देबासिस दास, डॉ. भावना जैन व्यासपीठावर होते. स्कूलचे शिक्षक, विद्यार्थ्यांचा समावेश विज्ञान प्रदर्शनात होता.

मनुष्याच्या जीवनात सकारात्मक बदल करण्यासाठी रोबोटिक्स टेक्नॉलॉजी, आर्टिफिशियल तंत्रज्ञानातून शाश्वता यासह पाणी, विज, शेती अशा विविध विषयांना धरून वेगवेगळे असे ५० च्यावर प्रोजेक्ट विद्यार्थ्यांनी स्वत: साकारून सादर केले आहे. त्यात न्युटनचा साधा नियम यापासून तर रोबोटिक्स, एआय, इलेक्ट्रोमॅकनिकल अशा विषयांच्या प्रोजेक्टस् ची मांडणीसुद्धा विद्यार्थ्यांनी केली आहे. विज्ञान आणि आपल्या दैनंदिन जीवनात ज्या गोष्टींचा उपयोग होतो अशा बाबींचा या प्रदर्शनात समावेश केला आहे. यामध्ये थ्रीडी प्रिंटर टेक्नॉलॉजी, सीएनसी प्लॉटर मशीन, रडास सिस्टिम्स्, इन्फिनिटी मिरर, फायर फायटर रोबोट, लेसर सिक्युरिटी सिस्टिम्स्, वाईंड मील ट्री, शिलाई मशीन, एअर हॉकी, डेकोरेटिव्ह लाईट, लेसर सिक्युरिटी सिस्टिम्स्, पीन होल कॅमेरा, स्मार्ट डोअर अलार्म, आय ब्लिंक कार कंट्रोल, न्युटनचा नियम, इकॉलॉजी पिऱ्यामीड, मानवाचा सांगाडा (ह्युमन कलेटन), मानवी शरीरातील फुफ्फुसांचे कार्य, रोबोटिक्स, ब्रेक आऊट, आरजीबी कलर मिक्सिंग, पेंटाग्राफ, रडार सिस्टिम, एअर हॉकी, पिझो इलेक्ट्रीसिटी आणि व्हर्टिकल विंड जनरेटर, वॉटर रॉकेट असे अनेक विषयांवरील अत्याधुनिक प्रकल्पांची मांडणी अनुभूती निवासी स्कूलच्या इयत्ता ५ ते १२ वीच्या विद्यार्थ्यांनी केली आहे.

जैन इरिगेशनचे व्यवस्थापकीय संचालक अजित जैन व अतुल जैन यांनी प्रत्येक प्रोजेक्टला भेट देऊन विद्यार्थ्यांकडून साकारण्यात आलेला प्रयोग समजावून घेतला. उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन अन्मय जैन याने केले.

शहरातील रुस्तुमजी इंटरनॅशनल स्कूल, भगिरथ हायस्कूल, सेंट टेरेसा स्कूल, आयडीएल इंग्लिश मिडीयम स्कूल, वर्ल्ड स्कूल भुसावळच्या विद्यार्थ्यांनी हे प्रदर्शन बघण्यासाठी हजेरी लावली. संबंधित शाळांच्या विद्यार्थ्यांनी अनुभूती सायन्स व टेक्नॉलॉजी मिट व अनुभूती सायन्स क्विज स्पर्धेतसुद्धा सहभाग नोंदविला.

अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी रोबोटिक्स व आर्टिफिशीयल तंत्रज्ञानासह स्वत: साकार केलेल्या फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, गणित, इंजिनेअरिंग आणि रोबोटिक्स टेक्नॉलॉजी वर आधारीत अत्याधुनिक विज्ञान प्रदर्शन बघण्यासाठी खुले ठेवण्यात आले आहे. उद्या दि. ८ जानेवारी ला सकाळी ९ ते सायंकाळी ४ पर्यंत शहरातील स्कूलमधील विद्यार्थ्यांना प्रदर्शन बघण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. यासाठी समन्वयक स्नेहल जोशी ९३०९९१८१७८ यांच्याशी संपर्क साधवा असेही आवाहन संचालक मंडळाकडून करण्यात आले आहे.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button