जळगावात रंगणार ‘पत्रकार प्रीमियर लीग’ 10 ते 12 फेब्रुवारी दरम्यान

जळगाव, (धर्मेंद्र राजपूत) दि.३० – समाजाचा चौथा आधारस्तंभ असलेले पत्रकार नेहमीच जीवाची बाजी लावत, ऊन, वारा, पाऊस, थंडी सहन करीत दिवसरात्र धावपळ करीत असतात. गेल्या वर्षभराच्या कालावधीत दोन मोठ्या निवडणुका पार पडल्या. सणोत्सव आटोपल्यावर विविध धर्म, जात, शासकीय, निम शासकीय कार्यालयातर्फे क्रिकेटसह इतर स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. सर्वच आपला विचार करतात मात्र पत्रकारांचा कुणीही विचार करत नाही. पत्रकारांच्या मनोरंजनासाठी आणि जिल्ह्यातील सर्व माध्यमाच्या पत्रकारांना एकत्र करण्याच्या उद्देशाने राज्यात प्रथमच जळगाव शहरात पत्रकार प्रीमियर लीगचे आयोजन करण्यात आले आहे
शिवतीर्थ मैदानावर १० ते १२ फेब्रुवारीला रंगणार सामने :
प्रत्येक तालुक्यासह २४ संघांचा असणार सहभाग
पत्रकार प्रीमियर लीगबाबत माहिती देण्यासाठी गुरुवार दि.३० रोजी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी पत्रकार वाल्मिक जोशी, किशोर पाटील, चेतन वाणी, वसीम खान, सचिन गोसावी, जकी अहमद आदी उपस्थित होते. माहिती देताना त्यांनी सांगितले की, आम्ही पत्रकारांच्या मनोरंजनासाठी आणि कल्याणासाठी उपक्रम राबविण्याचा एक छोटासा प्रयत्न करीत आहोत. याच अनुषंगाने, आम्ही दि.१०, ११, १२ फेब्रुवारी रोजी शिवतीर्थ मैदान याठिकाणी पत्रकार प्रीमियर लीग आयोजित करण्यात येणार आहे. ही स्पर्धा जिल्हाभरातील पत्रकारांना एकत्र करून खेळली जाणार आहे. स्पर्धेत प्रत्येक तालुक्यातील पत्रकारांचा एक संघ असणार आहे. पत्रकारांमधील सुसंवाद, खेळण्याची वृत्ती आणि मैत्री वाढवण्यासाठी स्पर्धेतून एक उत्तम संधी निर्माण होईल, असा आम्हाला विश्वास आहे.
पत्रकारांचे २० तर शासकीय ४ संघांचा सहभाग
स्पर्धेत जिल्ह्यातील पत्रकारांचे १४, जळगाव शहरातील ५, संपादक असे एकूण २० तर लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, पोलीस प्रशासनाचा संघ असे २४ संघ सहभागी होणार आहे. ३ दिवसीय स्पर्धेत सहभागी खेळाडूंकडून एकही रुपया घेतला जाणार नाही. समारोप सोहळ्यात ट्रॉफीसह हजारो रुपयांची बक्षिसे दिली जाणार असून स्पर्धा सर्वोत्तम करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
सामण्यासाठी तालुक्यातून नावे मागवण्यात आली असून प्रत्येक संघात १३ खेळाडूंचा सहभाग असणार आहे. प्रत्येक सामना ८ षटकांचा राहणार असून टेनिस बॉलवर खेळला जाईल. तरी सर्व पत्रकारांनी सहकार्य करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आह