शक्ती फाऊंडेशन तर्फे प्रजासत्ताक दिन निमित्त विविध उपक्रम संपन्न…

जळगांव दि 27 विवेकानंद नगर येथे शक्ती फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष सौ.भारती जि.रंधे यांच्या तर्फे प्रजासत्ताक दिना निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्या मध्ये प्रामुख्याने संविधान गौरव अभियान अंतर्गत सामूहिक संविधान उधे्षिका वाचन तसेच महिलांसाठी विविध स्पर्धा घेऊन भेट वस्तू देण्यात आले
यावेळी प्रमुख अतिथी आमदार सुरेश दामू भोळे, माजी नगरसेवक ललित कोल्हे, दर्जी फाऊंडेशनचे गोपाल दर्जी,नगरसेविका सिंधुताई कोल्हे, माजी महापौर सीमाताई भोळे, शिवसेनेच्या सौ.सरिताताई माळी-कोल्हे, सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
गोपाल दर्जी यांनी संविधानाचे उद्दे्षिका वाचन करून कार्यक्रम संपन्न केला…
कार्यक्रम संपल्या नंतर सर्व परिसरातील महिलांना हळदी कुंकू लावून भेटवस्तू देण्यात आल्या..
कार्यक्रमाचे आयोजन शक्ती फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष सौ.भारती जि. रंधे यांनी केले तसेच या कार्यक्रमासाठी विवेकानंद नगर परिसरातील मिलिंद चौधरी, गजानन नाना पाटील,अशोक पाटील, प्रमोद पाटील, विलास सुतार,सतीश राजपूत, योगेश पाठक,धीरज चौधरी,प्रकाश सोनावणे, किरण दादा, मोनू दादा,सोपान पाटील,ॲड.अभिजीत रंधे, आकाश भंगाळे, मोहित सावडेकर, मयूर देशमुख,सौ. प्रियांका नारखेडे,सौ.सुनंदा सुतार,सौ.नेहा तळेले, सौ.प्रियांका रंधे, सौ.लक्षमी बोराडे, मृणालिनी रंधे यांनी उपस्थित राहून यशस्वी नियोजन केले व प्रमुख मान्यवरांचे स्वागत केले.