बहिणाबाई विशेष वैद्यकीय सन्मान २०२५ पुरस्कार
विकी राजपूत याचा विशेष बहिणाबाई सन्मानाने सन्मानीत

जळगाव दि.27. भरारी फाउंडेशनतर्फे गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या बहिणाबाई महोत्सवाचा सोमवारी सायंकाळी समारोप झाला. यावेळी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीं संस्थांना बहिणाबाई विशेष सन्मानाने सन्मानीत करण्यात आले.
यामध्ये डॉ. अमोल पाटील, डॉ. धीरज चव्हाण, विक्की ईश्वर राजपूत, डॉ. मंदार पंडीत, सिताराम महाजन,किरण सैंदाणे, यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
विक्की ईश्वर राजपूत यांनी वैद्यकीय आघाडीच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून वैद्यकीय क्षेत्रात गरीब व गरजूंना सामाजिक आरोग्य सेवा पुरवत आहे. त्यामुळे अनेक गरजू व गरीब रुग्णांना यामध्ये फायदा होत आहे. तसेच वेगवेगळ्या प्रमाणामध्ये रक्तदान शिबिर,आरोग्य शिबिर, नेत्र तपासणी, रक्त तपासणी रक्तदान, ई.सी.जी. तपासणी, हृदव तपासणी, स्त्रीरोग तपासणी, बालरोग तपासणी आणि संबंधित शस्त्रक्रिया या मोफत शिबिरांचे आयोजन करून, अनेक गोरगरीब गरजू रुग्णांना बिलामध्ये सवलत मिळवून देणे, सवलतीच्या दरात अथवा मोफत उपचार करून देण्यास अहोरात्र प्रयत्न करत असल्याने या कार्याची दखल घेत भरारी फाउंडेशन आयोजित बहिणाबाई महोत्सवात यावर्षाचा बहिणाबाई विशेष वैद्यकीय सन्मान २०२५ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी मंचावर आमदार सुरेश भोळे, जिल्हा पुरवठा अधिकारी संजय गायकवाड, अपर कोषागार अधिकारी कैलास सोनार, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक अमित तायडे, जिल्हा दूध उत्पादक संघाचे व्यवस्थापकीय संचालक शैलेंद्र मोरखेडे, बाळासाहेब सुर्यवंशी, भरारी फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक परदेशी आदी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी मोहित पाटील, सचिन महाजन यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विनोद ढगे यांनी केले.