राजकीय
अनिल अडकमोल यांची निवड
जळगांव,दि.24 डिसेंबर (धर्मेंद्र राजपूत):रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे अनिल अडकमोल यांची नुकतीच केंद्राच्या अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक उपविभागीय दक्षता व नियंत्रण समितीवर निवड करण्यात आली आहे.केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या शिफारशीवरून समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे. यांचे कार्य क्षेत्र जळगांव-जामनेर उपविभाग जळगांव भाग आहे.
समितीमध्ये विलास सोनवणे, गजानन सोनवणे ,सिद्धार्थ सोनवणे, प्रवीण आढागळे, मिलिंद सोनवणे, प्रताप बनसोडे,यांची नियुक्ती करण्यात आली आहे.