जैन इरिगेशनचा ‘बेस्ट इनिशिएटिव्ह अवार्ड’ने गौरव
दि.23 डिसेंबर प्रतिनिधी : राष्ट्रीय केळी संशोधन केंद्राच्यावतीने ‘भौगोलिक निदेशांक प्राप्त केळीची निर्यात आव्हाने संधी व भविष्यातील वाटचाल‘ या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २१ डिसेंबर रोजी अपेडाचे चेअरमन डाॅ. अनगामुथू (आयएएस) यांच्या हस्ते उद्घाटन झाले. उद्घाटनपर संबोधन करताना डाॅ. अनगामुथु म्हणाले की, शंभर वर्षांपू्र्वी द. अमेरिकेत तेथील कंपन्यांनी केळी निर्यात सुरु केली. आज आशिया खंडात ८० टक्के व लॅटीन अमेरिकेत २० टक्के केळी होते. आपल्याला मागे वळून बघण्याची गरज आहे आणि जगातील चौथ्या महत्त्वाच्या पिकाबद्दल तंत्रज्ञानाची जोड देऊन काम होणे गरजेचे आहे. आपण गतवर्षी ३.४ लाख टन केळी निर्यात केली पण आपण कुठे कमी पडत आहोत याचा अभ्यास करुन काम केल्यास टिश्यूकल्चर, पॅकींग तंत्रज्ञान, लागवड तंत्रज्ञान यावर लक्ष देणे गरजेचे आहे. साधारण सामुग्रीचा उपयोग करुन भौगोलिक निर्देशांकीत केळीच्या जातींना युरोप व आखाती देशात प्रमोट करणे गरजेचे आहे. आज आपण पंधरा देशात केळी निर्यात करीत आहोत. परंतु आपण खूप जास्त देशात केळी निर्यात करु शकतो इतकी आपली क्षमता आहे. तामीळनाडू कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डाॅ. गीतालक्ष्मी यांनी केळीसाठी ठिबक सिंचन व फर्टिगेशन या तंत्रज्ञानावर आम्ही खूप काम केले त्याचे अचूक व शास्त्रोक्त वापर करुन निर्यातक्षण केळी आपण तयार करु शकतो यावर भर दिला. बागलकोट कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डाॅ. इंद्रेश यांनी कर्नाटकमध्ये माती, पाणी व वातावरण निर्यातक्षण केळी उत्पादनासाठी उत्तम असून केळीसाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे सांगितले. जैन इरिगेशनच्या केळी संशोधन व विकास कार्याला अधोरेखित करत ‘बेस्ट इनिशिएटिव्ह अवार्ड‘ने गौरव करण्यात आला. कंपनीच्यावतीने केळी तज्ज्ञ के.बी. पाटील यांनी हा पुरस्कार स्वीकारला
त्रीची येथे केळी निर्यातीवर राष्ट्रीय कार्यशाळा
स्वागतपर भाषणात डाॅ. आर. सेल्वराजन – संचालक, राष्ट्रीय केळी संशोधन केंद्र यांनी आपण ग्रॅण्ड नाईन जातीची केळी मोठ्या प्रमाणावर निर्यात करीत आहोत परंतु विविध स्थानिक जातींना भौगोलिक निदेशांक मिळालेले आहेत. त्यांची निर्यातसुद्धा वाढली पाहीजे, कारण २० मिलियन तामिळ नागरिक परदेशात राहतात आणि त्यांची पसंती स्थानिक जातींना असते. डी.जी.एफ.टी.च्या महाव्यवस्थापक श्रीमती राजलक्ष्मी देवराज यांनी निर्यातदारांनी पुढे यावे असे सांगून, फोरेन ट्रेड मंत्रालय त्यांना खूप सहकार्य करीत असल्याची माहीती त्यांनी दिली. दुसऱ्या सत्रामध्ये जैन इरिगेशनचे वरिष्ठ केळी तज्ज्ञ के.बी. पाटील यांनी सांगीतले की, आंतरराष्ट्रीय मानकाप्रमाणे केळी उत्पादनासाठी काम करावे. जेणे करुन युरोप, जापान, रशिया या देशांनासुध्दा आपण केळी पुरवू शकू. जगात केळीचे उत्पादन घटले आहे. आपण भौगोलिकदृष्ट्या आखाती देश दुबई, रशिया, जपान, इराण, चीन यांच्याजवळ आहोत. त्यामुळे इक्वेडोर व फिलीपीन्स प्रमाणे काम केल्यास निर्यातीत मोठी वाढ होईल. कारण ठिबक, टिश्यूकल्चर, फर्टिगेशन व उत्तम तंत्रज्ञानाचा अवलंब जळगाव व सोलापूर मध्ये मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्याचा फायदा निर्यातीसाठी होत आहे. ऑस्ट्रीया येथील एफ जी झिंगल, श्री. अनिल डी. कस्टम आयुक्त त्रिची, तामीळनाडू बनाना फेडरेशन सचिव श्री. अजितन, डाॅ. अझर पठान, केळी निर्यात तज्ज्ञ कार्तीक जयराम, अलायन्स इन्शुरन्सचे सी.ए. श्रीनीवासन, डाॅ. के. इन्गरसल, जीएम नाबार्ड, पी. तमील सेल्वन उदमलपेठ यांच्यासह अनेक अभ्यासकांनी वेगवेगळे सादरीकरण करुन केळी निर्यात, शीत साखळी, कस्टम, प्लन्ट, काॅरेन्टाईन, पॅकींग, शिपींग, अर्थसहाय्य उत्पादन तंत्रज्ञान अशा अनेक विषयांवर चर्चा झाली. सोलापूर येथून किरण ठोके, बलरामसिंग सोळुंखे, चाळीसगाव, सील्वाकुमार ए.पी. करपैय्या यांचेसह केळीशी संबंधीत ३०० जणांनी सहभाग नोंदविला. केळी निर्यातीला उत्तम चालना देणारी कार्यशाळा झाली.
जैन इरिगेशनचा केळीतील इनोव्हेटीव्ह कार्यामुळे सन्मान
जैन इरिगेशनच सिस्टीम्स लि. नेहमीच केळी पिकासाठी पुढाकार घेऊन विविध प्रकारचे काम करीत आहे. केळीसाठी ठिबक सिंचन, टिश्यूकल्चर, ऑटोमेशन या सारखे तंत्रज्ञान निर्माण करुन केळी उत्पादनात दुप्पटीपेक्षा अधिक वाढ झालेली आहे. शेतकऱ्यांची उत्पादकता जैन इरिगेशनच्या उच्च कृषी तंत्र ज्ञानामुळे झालेली आहे. त्यासाठी ‘बेस्ट इनिशिएटिव्ह अवार्ड‘ देऊन गौरव करण्यात आला. कंपनीचे सहकारी केळी तज्ज्ञ के.बी. पाटील यांनी डाॅ. अनगामुथु (अपेडा चेअरमन) यांच्याहस्ते हा पुरस्कार स्वीकारला.