जळके – विटनेर परिसरात गुलाबराव पाटील यांना जनतेचा भक्कम पाठिंबा !
वडली येथे घोड्यावरून मिरवणूक : भजनी मंडळ व शेतकऱ्यांनी केले भव्य स्वागत !
जळके / जळगाव दि. ५ – जळके – विटनेर परिसरात महायुतीचे उमेदवार आणि शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांना जनतेचा प्रचंड पाठिंबा मिळत आहे. त्यांच्या नेतृत्वात परिसरातील रस्ते, पूल, सिंचन बंधारे, पाणीपुरवठा योजना, ग्रामपंचायत कार्यालयांच्या इमारती, जळके येथे वीज उपकेंद्राच्या क्षमतेत वाढ आणि इतर विविध विकास कामे पार पडली आहेत. ग्रामस्थांशी संवाद साधताना गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, परिसराच्या उर्वरित विकासासाठी कटिबद्ध आहे. गावांमध्ये विविध विकास कामे केल्याने गुलाबराव पाटील यांना जळके-विटनेर परिसरात त्यांना जनतेचा भक्कम पाठिंबा लाभत आहे. विशेषतः मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजनेअंतर्गत आयोध्या दर्शनावरून परतलेल्या 60 जेष्ठ भाविकांनी व भजनी मंडळानी दिंडी काढून गुलाबराव पाटील यांचे स्वागत केले आणि त्यांना आशीर्वाद दिला.
गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नांमुळे जळके येथे वीज उपकेंद्राची क्षमता वाढवण्यात आली आहे. तसेच, विटनेर येथे सौर उर्जेच्या प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी विशेष योजना सुरू करून ज्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. त्यांनी परिसरातील शेती रस्त्यांचे खडीकरण ,डांबरीकरण करून शेतकरी वर्गाला सहज वाहतुकीची सोय उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे.
वडली येथे घोड्यावरून मिरवणूक
वडली गावात महायुतीचे उमेदवार गुलाबराव पाटील यांचे घोड्यावरून भव्य मिरवणुकीत जल्लोषात स्वागत करण्यात आले. स्थानिक जनतेच्या उत्साहात भरभरून सहभाग दिसला, ज्यामध्ये ढोल-ताशांचा गजर आणि पारंपरिक वेशभूषेतील स्वागत सोहळा पाहायला मिळाला.
यांची होती उपस्थिती
भाजपाचे जिल्हाध्यक्ष ह. भ. प. ज्ञानेश्वर जळकेकर महाराज, मा. जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, चंद्रशेखर पाटील, दुध संघाचे रमेशआप्पा पाटील, महिला समन्वयक शितलताई चिंचोरे, तालुका प्रमुख शिवराज पाटील, राजेंद्र चव्हाण, तालुकाध्यक्ष हर्शल चौधरी, जळके, विटनेर लोणवाडी, सुभाषवाडी, पाथरी, वसंतवाडी , वराड येथील अनुक्रमे सरपंच राजू भैय्या पाटील, ललित साठे, जयश्री राठोड, अर्जुन शिरसाट, विनोद पाटील, राजाराम राठोड, आदी सरपंच तसेच साहेबराव वराडे, सचिन पाटील, डंपी सोनवणे, श्याम परदेशी, सागर परदेशी, सुरेश गोलांडे, रवी चव्हाण, संदीप सुरळकर, विकास जाधव , धोंडू जगताप, पी.के. पाटील, ज्ञानेश्वर चव्हाण, गोकुळ राठोड, सरीचंद राठोड, उखर्डू राठोड, अनिता चिमणकारे, मंगला गोपाळ, सुनील ब्राम्हणे, विजय जाधव रविंद्र पाटील, पंकज जाधव यांच्यासह महिला , महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रचंड संख्येने उपस्थित होते.