Uncategorized

आ.भोळेंच्या प्रचार रॅलीला नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद

कहो दिल से, राजूमामा फिर से" घोषणांनी शिवकॉलनी परिसर दणाणला 

जळगाव (धर्मेंद्र राजपूत ) : “कहो दिल से, राजूमामा फिर से”, “राजूमामा आगे बढो, हम तुम्हारे साथ है” अशा घोषणा देऊन शिवकॉलनी, हरिविठ्ठल नगर परिसरात महायुतीचे उमेदवार आ. राजूमामा भोळे यांच्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहाने प्रचार रॅली काढली. यावेळी परिसरातील विविध नागरिकांच्या घरी भेटी देऊन तसेच,मंदिरात जाऊन आ.भोळे यांनी पूजा करून विजयासाठी साकडे घातले.

जळगाव शहर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे तथा भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आ. राजूमामा भोळे यांनी मंगळवारी सकाळी प्रचाराला जोरदार सुरुवात केली. संध्याकाळी दुसऱ्या टप्प्यात शिव कॉलनी स्टॉप येथे प्रचार रॅलीला सुरुवात करण्यात आली. शिवकॉलनी परिसर, हनूमान मंदिर, आशाबाबा नगर परिसर, गजानन महाराज मंदिर परिसर, खंडेराव नगर, पंडितराव कॉलनी, हरिविठल नगर बाजार परिसर येथून श्रीधर नगर येथे समारोप करण्यात आला. शिवकॉलनीतील साईमंदिर व संकटमोचन हनुमान मंदिर येथे पूजा करून आ. भोळे यांनी दर्शन घेतले. त्यानंतर नारळ फोडून परिसरातील नागरिकांच्या गाठीभेटी सुरु केल्या. माजी नगरसेवक नितीन नन्नवरे यांच्या घरी सदिच्छा भेट दिल्यानंतर ओम श्री निष्कलंकी धाम येथे दर्शन घेऊन पूजा केली. तसेच सर्वज्ञ महादेव मंदिरात भेट देऊन मंदिरात पूजा करीत भगवान महादेवाचे दर्शन घेत विजयासाठी प्रार्थना केली.

तसेच शिवकॉलनी परिसरात एका भागात आत्माराम फकिरा कोळी यांचे निधन झाल्याबद्दल संवेदनशील आ. भोळे यांनी प्रचार व ढोल ताशे तात्काळ थांबवित केवळ मोजक्या कार्यकर्त्यांसह कोळी परिवाराच्या घरी भेट देत त्यांचे सांत्वन केले. त्यांना धीर देत परमेश्वर दुःख पेलण्याचे बळ देओ अशी प्रार्थना केली. प्रचारात भाजपाचे माजी महापौर सीमा भोळे, विधानसभा क्षेत्र प्रमुख विशाल त्रिपाठी, महानगर जिल्हाध्यक्ष उज्ज्वला बेंडाळे, मंडळ क्र. ४ चे अध्यक्ष मनोज काळे, मंडळ क्र. ६ चे अध्यक्ष बापू कुमावत, मनोज भांडारकर, बंटी नेरपगार, प्रदेश पदाधिकारी रेखा वर्मा, संभाजी शिंपी, प्रा. नितीन बारी, नितीन नन्नवरे, केदार देशपांडे, मनोज सपकाळे, रेखा पाटील, दीपमाला काळे, डॉ. वीरेन खडके, विजय वानखेडे, शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक गणेश सोनवणे, कुंदन काळे, स्वप्नील परदेशी, राहुल नेतलेकर, शोभा चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे महानगर जिल्हाध्यक्ष अभिषेक पाटील, लोक जनशक्ती पार्टीचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दीपक सपकाळे, जिल्हाध्यक्ष अशोक पारधे यांच्यासह भाजपा, शिवसेना, रिपाई, पीरिपा, लोकजनशक्ती पार्टी आदी महायुती घटकातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button