श्री.गोविंद महाराजांच्या दर्शनाने किशोर आप्पा पाटील याच्या प्रचाराची उद्या पिंपळगाव येथून सुरुवात
पाचोरा दि.4 खा.स्मिता वाघ व आमदार किशोर आप्पा पाटील आणि मठाधिपती श्री.शिवानंद महाराज भाजपा शिवसेना महायुतीचे पदाधिकारी मतदारांच्या भेटीला पाचोरा – विधान सभा निवडणुकीसाठी शिवसेना भाजपा राकाँ रिपाई महायुतीचे उमेदवार आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या प्रचारार्थ उद्या मंगळवार 5 रोजी पिंपळगाव हरे येथून सुरुवात करण्यात येणार आहे.यानिमित्ताने सकाळी 8:30 वाजता संत गोविंद महाराज मंदिरात महाराजांचे दर्शन घेवून प्रचाराचा नारळ वाढवण्यात येणार आहे.यानंतर मतदार बांधवांच्या भेटी घेणार आहेत
रॅलीसाठी भारतीय जनता पार्टीच्या खा.श्रीमती स्मिताताई वाघ महायुतीचे उमेदवार आमदार किशोर आप्पा पाटील,सेनेचे जिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मधुकर काटे,डॉ. शांतीलाल तेली,ता प्रमुख सुनील पाटील,बाजार समितीचे सभापती गणेश पाटील,वसंत भाऊ गीते,विनोद महाजन,अनिल महाजन,नंदू पाटील,ज्ञानेश्वर सोनार,रवी गीते,रमेश नाना,सुनील पाटील,राहुल पाटील,इंदल परदेशी,विजय राठोड,बंटी राठोड,किशोर पाटील आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.यावेळी भाजपा शिवसेना रीपाई महायुतीचे पदाधिकारी आजी माजी लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.