Uncategorized
Trending

गुलाबराव पाटलांच्या प्रचारासाठी दोघे सुपुत्र प्रचाराच्या मैदानात

धरणगाव/जळगाव दि. 30 -गुलाबराव पाटील यांच्या प्रचार्थ त्यांचे दोन पुत्र व अनेक युवकांना सोबत घेवून गावो- गावच्या प्रत्येक गल्लीतून ही दोन भावंडं जनतेच्या आशीर्वाद घेण्यासाठी फिरत आहे. “गुलाबराव पाटील हे केवळ आमचे वडील नाहीत, ते या मतदार संघाचे भूमिपुत्र असून त्यांनी केलेल्या विकास कामांसाठी आपले आशीर्वाद व खंबीर साथ द्यावी अशी भावनिक साद ते घालत आहेत. विकासाच्या ध्येयाशी जोडलेली ही भावनिक साद मतदारांच्या हृदयात नवी उर्जा आणि नवीन अशा निर्माण करत आहे.

दोन भावंडांचा तीन दिवसात 22 गावात झंझावाती प्रचार

मंत्री गुलाबराव पाटील यांचे पुत्र जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील व लघुउद्योजक विकी पाटील या दोन भावंडांचा तीन दिवसात चांदसर , दोनगाव बु., टहाकळी, आव्हाणी, भोकणी, पथराड बु. पथराड खु., लाडली फुलपाट पाळधी बु. पाळधी खु.,धार, शेरी, कवठळ, दुसखेडा, एकलग्न, पोखरी तांडा, दोनगाव खु. झुरखेडा, निमखेडा, तारखेडा सह इतर 22 गावांमध्ये झंझावाती प्रचार करून मतदाराशी संवाद साधला. यावेळी मतदारांनी गुलाबराव पाटील यांना आशीर्वाद देऊन भक्कम पाठबळ असल्याची ग्वाही दिली. धनुष्यबाण व गुलाबराव पाटील व नेत्यांचे लहान मोठे कट – आउट, भगवे रुमाल, टोप्या व मुखवटे यांचा उपयोग केल्याने प्रचार रॅलीत युवकांचा उत्साह व जनतेचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात दिसून येत होता. प्रचार रॅलीमध्ये पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button