महाराष्ट्र प्रदेश तेली महासंघ जळगांवच्या जिल्हाध्यक्षपदी दत्तात्रय चौधरी
जळगाव (धर्मेंद्र राजपूत ) महाराष्ट्र प्रदेश तेली महासंघाच्या जळगांवच्या जिल्हाध्यक्षपदी दत्तात्रय चौधरी यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती महासंघाचे प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी यांनी दिलेल्या नियुक्तीपत्राद्वारे करण्यात आले आहे.
या संदर्भात दत्तात्रय चौधरी यांना याबाबतचे नियुक्तीपत्र नुकतेच प्राप्त झाले आहे. पत्रात म्हटले आहे की, संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या आशीर्वाद घेऊन राज्यभर तेली समाज संघटन अत्यंत प्रभावीपणे उभे करण्याच्या संदर्भातील जबाबदारी आपल्याकडे देण्यात आली आहे. त्यामुळे तेली समाजाला सामाजिक, राजकीय, आर्थिक व शैक्षणिक दृष्ट्या संपन्न करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करावे आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आले आहे. दरम्यान दत्तात्रय चौधरी यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यामुळे जळगाव जिल्ह्यातील सर्व तेली समाज बांधवांच्या वतीने नियुक्ती बद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.